मोदींच्या सर्वात विश्वासू पियूष गोयल यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

| Updated on: Jun 09, 2024 | 9:07 PM

पियूष गोयल यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मोदी यांच्या सर्वात विश्वासातील एक म्हणून पियूष गोयल यांना ओळखले जाते. त्यांनी मुंबई - उत्तर लोकसभा मतदार संघातून मोठा विजय मिळविला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वातील असलेले आणि भाजपाचे निष्ठावंत पियूष गोयल यांनी आज राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात रंगलेल्या सोहळ्यात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्री आणि व्यापार आणि वाणिज्य, तसे ऊर्जामंत्री अशी विविध खाती यशस्वीपणे हाताळली आहेत. लोकसभेत त्यांचे महत्व पाहून मोदी यांनी त्यांना सर्वात सुरक्षित अशा मुंबई -उत्तर लोकसभा मतदार संघातून त्यांना उभे करण्यात आले. तेथून त्यांना मोठा विजय मिळविला. पियूष गोयल यांच्या विरोधात कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात भुषण पाटील यांना उभे केले होते. पियूष गोयल मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पियूष गोयल यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे देखील भाजपाचे खजिनदार होते. तर पियूष गोयल देखील खजिनदार म्हणून काम पाहात होते.

Published on: Jun 09, 2024 09:03 PM
नितीन गडकरी यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
एकनाथ शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी घेतली शपथ