Mohit kamboj : बारामती अॅग्रोचा अभ्यास सुरु, लवकरच तपशील देणार, कंबोज यांचा इशारा
'माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!,'
मुंबई : भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी एक ट्विट (Tweet) केलंय. त्यात त्यांना राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय, त्यात म्हटलं की, ‘मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातूव राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असंही ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या चौकशी शक्यताय. आता येत्या काळात यावर काय घडामोडी घडता ते पाहणं महत्वाचं ठरेल. दरम्यान, रोहित पवार यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं बोललं जातंय.
Published on: Aug 22, 2022 11:00 AM