“विद्याताई, जय श्रीराम”, मोहित कंबोज ट्विटमधून काय सुचवू पाहताहेत?

| Updated on: Aug 28, 2022 | 8:44 AM

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Komboj) हे नेहमी त्यांच्या ट्विटवरुन चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सत्तांतरादरम्यानचे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले होते. तर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाईबाबतचे ट्विट केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा (Vidya Chavan) विद्या यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे. विद्याताई जय श्रीराम (Jay Shree Ram) या त्यांच्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला होता. याबाबत विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतरच कंबोज यांचे हे ट्विट चा नेमका काय इशारा आहे हे पहावे लागणार आहे.

 

Published on: Aug 28, 2022 08:44 AM
“खोड्या बंद करा, असली दादागिरी चालणार नाही!”, शहाजीबापू पाटलांचा अधिकाऱ्याला फोन
“उद्धव ठाकरेंना घरात ठेवून, काँग्रेसला गाफील ठेवून जयंत पाटलांना राष्ट्रवादीला मोठं करायचं होतं”, उन्मेश पाटील यांचे गंभीर आरोप