खर्च कोटीत, हातात मात्र काहीच नाही; ‘या’ जिल्ह्यातील 170 गावांमध्ये पाणीटंचाइचे सावट
अनेक ठिकाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडलेला दिसत नाही. अशीच परिस्थिती ही बुलढाणा जिल्ह्यात आहे. येथ सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने जलस्त्रोत कोरडे पडले आहेत.
बुलढाणा : वाढत्या उन्हाच्या झळा आणि त्यात मान्सूनची दांडी यामुळे अनेक भागात चिंतेचे मळभ आहे. यातच अनेक भागात आता पिण्याच्या पाणीची भ्रांत उडाल्याने महिलांना घराबाहेर डोक्यावर हंडा घेऊन राणावनात फिरावं लागत आहे. हे ही उन्हा तान्हाचं. त्यामुळे नागरिकांच्या मनात रोष निर्माण होताना दिसत आहे. तर अनेक ठिकाणी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडलेला दिसत नाही. अशीच परिस्थिती ही बुलढाणा जिल्ह्यात आहे. येथ सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यामधील खारनपानपट्यासह इतर भागातील 170 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, या पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात या गावांसाठी 197 उपाय योजना केल्या असून 1 कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात आला आहेत. मात्र पाण्याच्या प्रश्न जैसेथे आहे. सध्या जिल्ह्यातील 15 गावांमध्ये 16 टँकरद्वारे सद्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 170 गावांसाठी 181 खाजगी विहिरी अधिग्रहित करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.