पावसाळ्यात मेळघाटात काय होते अवस्था? अमरावतीत किती गावांना पुराचा धोका?
अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर हा जरा जास्तच असतो. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजूवन हे विस्कळीत होत असतं. तर अनेक ठिकाणी पूर येत असल्याने गावांचा संपर्क हा तुटताना दिसतो.
अमरावती : आता मे संपत आला आहे. तर जून महिना सुरू होण्यास काहीच दिवस राहिले आहे. जून महिन्यात आणि त्यानंतर अनेक ठिकाणी मान्सूनची जोरदार हजेरी असते. ज्यामुळे पूर येण्यासारखी परिस्थिती उद्धभवते. अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर हा जरा जास्तच असतो. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजूवन हे विस्कळीत होत असतं. तर अनेक ठिकाणी पूर येत असल्याने गावांचा संपर्क हा तुटताना दिसतो. यावर्षी मात्र यावर संभाव्य आपत्तीचं संकट लक्षात घेऊन प्रशासनानं सतर्कता दाखवली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. अमरावती जिल्ह्यात 482 गावांना पुराचा धोका असल्याचे समोर आले असून आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. तर मेळघाटातील काही गावांचा संपर्क तुटतो त्यावरही उपाययोजनांची गरज लक्षात घेतली जाणार आहे. तसेच येथे पावसाळ्यात गावाजवळून वाहणाऱ्या नदीमुळे गावकऱ्यांना धोका निर्माण होत असल्याचेही उघड झाले आहे. त्यासाठी संभाव्य आपत्तीचं संकट लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे.