Monsoon Session : ‘खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके’, विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी-Tv9

| Updated on: Aug 25, 2022 | 1:43 PM

आज अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

पावसाळी अधिवेशनात विधानसभेसह विधानपरिषदेच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. तर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजही विरोधकांनी अधिवेशना दरम्यांन पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली आहे. आज अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत बोके माजलेत बोके, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.

Aaditya Thackeray | 40 वर्षांत आम्ही गद्दारांना खूप काही दिलं – tv9
Aaditya Thackeray | सत्ताधारी पक्षामधील मंत्र्यांचा अभ्यास नाही, सभागृहात सिद्ध – tv9