Mohit Kamboj on Rohit Pawar | ‘घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचं पवारांचं काम’-tv9
रोहित पवारांना उद्देशून ट्विट करताना कंबोज यांनी, घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचा पवारांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.
पावसाळी अधिवेशन काळात एका मागून एक ट्वीट करत राजकारण गरम करणारे भाजप नेते मोहित कंबोज यांनी आता पुन्हा एकदा ट्वीट मालिका सुरू करण्याचे संकेत दिले आहे. यावेळी त्यांनी विद्या चव्हाण आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलेला आहे. तसेच रोहित पवारांना उद्देशून ट्विट करताना कंबोज यांनी, घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचा पवारांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काही चुकीचे केलेलं नसेल तर घाबरता कशाला? असा सवाल ही कंबोज यांनी रोहित पवार यांना केलेला आहे. त्याचबरोबर रोहित पवारांना उद्देशून बोलताना त्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नये असेही म्हटलं आहे.
Published on: Aug 28, 2022 11:33 AM