मान्सून 1 जूनला केरळात दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज
मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या बळीराजाचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत. मात्र आता लवकरच शेतकऱ्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. एक जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूच्या वाटचालीसाठी प्रतिकूल हवामान निर्माण झाल्याने मान्सूची वाटचाल संथ गतिने सुरू होती. मात्र आता अनकूल वातावरण निर्माण होताना दिसत आहे. सध्या केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.