12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Jun 08, 2022 | 9:38 AM

मान्सूच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या बारा जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान ख्यात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

सध्या मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. मान्सूच्या महाराष्ट्र  प्रवेशास विलंब झाल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान मान्सून संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनला विलंब झाला असतानाच राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा कडाका देखील वाढला आहे.

 

 

Published on: Jun 08, 2022 09:38 AM
विद्यार्थिनीची सोनसाखळी ओढली, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
पुणे- नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार