आणखी १५ आमदार फुटणार ? बच्चू कडू यांचा दावा, संजय राऊत म्हणाले बरोबर पण…

| Updated on: Feb 10, 2023 | 1:47 PM

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीतील आणखी किमान १५ आमदार फुटणार आहेत. ते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील ते आमदार नाहीत. पण अन्य पक्षातील

मुंबई : शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे बोलताना दावा केला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीतील आणखी किमान १५ आमदार फुटणार आहेत. ते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील ते आमदार नाहीत. पण अन्य पक्षातील आहेत. 20 – 25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार आपला काळ पूर्ण करेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. यावर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांचा दावा बरोबर आहे असे म्हटले आहे. बच्चू कडू स्वतः भाजप पक्षात प्रवेश करत आहेत. भाजपचे काही आमदार इतर पक्षात प्रवेश करत आहेत. बच्चू कडू यांची माहिती बरोबर आहे, असे सांगितले.

Published on: Feb 10, 2023 01:47 PM
गुलाबाच्या पायघड्या, हेलिकॉप्टरमधून स्वागत, पाहा बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नाचा ‘हा’ खास व्हायरल व्हिडिओ
राज ठाकरे यांची गुरू माँ कांचन गिरी यांनी घेतली भेट, काय झाली चर्चा?