अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शहरातल्या रामसेतू पुलावर 2 ते 3 फूट पाणी….!
कोकणत, पालघर, विदर्भात रेड आणि ऑरेंज अलर्ट सुरूच आहे. ज्यामुळे कोकणत, पालघर, विदर्भासह मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. तर चिपळून, रायगडमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे.
अकोला, 23 जुलै 2023 | गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसधार पावसाने हजेरी लावली आहे. तर कोकणत, पालघर, विदर्भात रेड आणि ऑरेंज अलर्ट सुरूच आहे. ज्यामुळे कोकणत, पालघर, विदर्भासह मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. तर चिपळून, रायगडमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. याचप्रकारे अकोला जिल्ह्यात रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन हे विस्कळीत झाला आहे. तर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोरणा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुराचं पाणी राम-सेतु पुलावरून दोन ते तीन फूट वाहताना पाहायला मिळतेय. हा पूल जुने शहर आणि नवीन शहर या दोन शहरांना जोडणारा आहे. मात्र या पुलावर्ती पाणी असल्याकारणाने आता ह्या पूलावरून वाहतून बंद करण्यात आली आहे. तर या नदीकाठील नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तेल्हारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.