पहाटेचे 3 वाजले, गर्दी हटेना, फटाके आणि पुष्पवृष्टी, मनोज जरांगे यांचे असे झाले स्वागत
धाराशिव तालुक्यातील येडशी, उपळा यां गावात भल्या पहाटे सभा झाल्या. उपळा येथे गेल्या 23 दिवसापासून तरुणांचे उपोषण सुरु आहे त्या उपोषणस्थळी जरांगे यांनी भेट दिली. फटाके, ढोल, ताशे यांच्या गजरात जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करीत त्यांचे ठीकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले जातेय.
धाराशिव : 5 ऑक्टोबर 2023 | रात्रीचे दोन वाजलेले असो की पहाटेचे 3 मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या सभेला धाराशिव जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावातील महिला, लहान मुली त्यांचे औक्षण करुन स्वागत करत आहेत. जरांगे यांनी सर्वांनी 14 ऑक्टोबरला अंतरवेली सराटी येथे यावं असं आवाहन केलंय. जवळपास 47 पेक्षा जास्त गावं आहेत. त्यात जवळपास 11 मोठ्या सभा झाल्या. पन्नास हजारापेक्षा जास्त लोक सभेला येताहेत. इतक्या रात्री माता, माउली , लहान बहिणी सगळं गाव उपस्थित आहे. त्यांच्या भावना सरकारने समजून घ्याव्यात. सरकारने भावना शून्य होऊ नये असे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्या आधारावर त्यांना आरक्षण दिले. आमच्याकडे सुद्धा शेती आहे, आमचा व्यवसाय सुद्धा शेती आहे. मग आम्हाला आरक्षण का नाही? ते तर आमचे रक्ताचे आहेत. आमचा रोटीबेटी व्यवहार आहे तरीही आम्हाला आरक्षण का नाही? हा आमचा मूळ प्रश्न असे असे ते म्हणाले.