कोल्हेंची ‘जानता राजावर’ प्रतिक्रीया, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊ शकतही नाही
एकूण परिस्थिची जाण असणं माहिती असणं आणि त्यावरून जर कोणी तसं म्हणत असेल तर ते कोणालाही वाईट वाटणं कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाशीही तुलना होत नाही आणि होऊ शकतही नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न देखील करू नये
नाशिक : स्वराज्यरक्षक, धर्मवीर, औरंगजेबनंतर आता राजकीय वर्तुळात जाणता राजावरून वाद सुरू झाला आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल केला होता. तर अजित पवार यांनी आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणा असे म्हटलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी कोल्हे म्हणाले की, हे प्रत्येकाचे मत आहे. दुर्दैवाने आम्ही फक्त प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतिहास पोहचवण्याची कृती करायला हवी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाशीही तुलना होत नाही आणि होऊ शकतही नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न देखील करू नये
तर जाणता राजा हे फक्त शिवाजी राजे होते. ते सोडून दुसरं कोणी असेल असं शरद पवार ही मानणार नाहीत. तर एकूण परिस्थिची जाण असणं माहिती असणं आणि त्यावरून जर कोणी तसं म्हणत असेल तर ते कोणालाही वाईट वाटणं कारण नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाशीही तुलना होत नाही आणि होऊ शकतही नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न देखील करू नये