‘कोरोना काळात मविआने भ्रष्टाचार केला, मृतांच्या टाळूवरच…’; भाजप खासदाराची बोचरी टीका

| Updated on: Jun 22, 2023 | 2:10 PM

कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवाशियांसह जगभरातील 100 एक देशांना लस पुरवली. त्यामुळे येथेच काय तर बाहेरही लोक वाचले. मात्र आपल्या राज्यातील तत्कालिन असणाऱ्या मविआ सरकारकडून जनतेची लूट झाली.

अमरावती : राज्यातील ठाकरे गटाच्या नेते अदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तींयावर काल ईडीचे छापे पडले. यावरून मविआवर आता टीका होताना दिसत आहे. खासदार अनिल बोंडे यांनी यांवरूनच महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवाशियांसह जगभरातील 100 एक देशांना लस पुरवली. त्यामुळे येथेच काय तर बाहेरही लोक वाचले. मात्र आपल्या राज्यातील तत्कालिन असणाऱ्या मविआ सरकारकडून जनतेची लूट झाली. त्या सरकारनं 2000 हजारला मिळणारा फॅन हा 5000 नं भाड्यानं घेतला. तर जो डोम 2 कोटीत होऊ शकतो त्याच्यासाठी बारा कोटी रूपये उधळण्यात आले. अशा प्रकारे कोरोना काळात साहित्य खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार झाला. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. मविआचं सरकार हे मेलेल्या मुडद्यावरच्या टाळूवरील लोणी खाणार होतं असा घणाघात केला आहे.

Published on: Jun 22, 2023 02:10 PM
“फार नाकाने कांदे सोलू नका…” संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा
“…आम्हाला ऊद्धव ठाकरे यांची काळजी वाटते”, मनीषा कायंदे असं का म्हणाल्या?