‘…आम्ही गद्दार, आम्ही लाचार, मराठी माणलासा लागलेला शिंदे कलंक’; शिवसेना नेत्याची घणाघाती टीका
हा मेळावा मेळावा रंग शारदा सभागृह वांद्रे येथे पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. याचदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी देखील भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) मुंबईत संयुक्त मेळावा पार पडला. हा मेळावा मेळावा रंग शारदा सभागृह वांद्रे येथे पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. याचदरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी देखील भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली. सावंत यांनी, भाजपवर टीका करताना जे जे येथे महाराष्ट्रात यायला हवं होतं तेते गुजरात नेलं अशी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, सगळं तिकडं जातयं, पण आम्ही शंड, आम्ही मिंदे, आम्ही गद्दार, आम्ही लाचार तर मराठी माणसाला लागलेला हा कलंक आहे. तर हा कलंक पुसण्याचं काम शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडला करावं लागेल. तर ते केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाय असेही सावंत असे म्हणाले. Maharashtra Politics