‘जर नेपाळ मार्गे ती भारतात आली असेल तर बीएसएफवाले काय करत होते?’; ओवैसी यांची सीमावर मिश्किल प्रतिक्रीया
सध्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सीमा हैदर आणि सचिन हे राहत आहेत. यावरून सध्या जोरदार चर्चा होत असतानाच सीमा हैदरने पतीला घटस्फोट देऊन भारतात आल्याचे तर गुलाम हैदरने घटस्फोट झालेला नाही, असे म्हटलं आहे, तर यावरून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे न्याय मागितला आहे.
नांदेड : मध्यंतरी सनी देओल आणि अमिशा पटेल यांची एक चित्रपट आळा होता ‘गदर लव्हस्टोरी’. त्याची देशभर आणि देशाच्या बाहेरही मोठी चर्चा झाली होती. आताही देशात अशी च एका प्रेमकहानीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ही प्रमेकहानी आहे भारतात येऊन लग्न करणार्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची. सध्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सीमा हैदर आणि सचिन हे राहत आहेत. यावरून सध्या जोरदार चर्चा होत असतानाच सीमा हैदरने पतीला घटस्फोट देऊन भारतात आल्याचे तर गुलाम हैदरने घटस्फोट झालेला नाही, असे म्हटलं आहे, तर यावरून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे न्याय मागितला आहे. एकीकडे अशी चर्चा रंगली असतानाच आता एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावरून सरकारला आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत खोचक सल्ला देखील दिला आहे. ओवैसी यांनी, पाकिस्तानमधून येऊन तिने लग्न केले, धर्म बदलला मग हा लव्ह जिहाद नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर जर ती नेपाळ मार्गे ती भारतात आली असेल तर बीएसएफ काय करत होती? हा प्रश्न गृहमंत्री अमित शाह यांना विचारला पाहिजे असेही ओवेसी म्हणाले. त्याचबरोबर जर ती महिला रॉ इजंट असेल तर तिच्यावर एक चित्रपट व्हायला पाहिजे तो हिट होईल अशी मिश्किल टिपण्णी देखील केली आहे.