Brij Bhushan Singh on Ayodhya | मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार समजतो – बृजभूषण सिंह
उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यामुळे राज्यातील राजकारण तापले असून बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. तसेच त्यांनी, मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार समजतो असेही म्हटलं आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा वसा हाती घेत वातावरण तापवलं होतं. तसेच आपण अयोध्या दौरा करू असे त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांना उत्तर भारतीयांना मारहान केल्या प्रकरणी मोठ्या विरोधाला तोंड द्यावं लागलं आहे. भाजप खासदार बृजभूषण (BJP MP Brijbhushan)सिंह यांनी आपण उत्तर प्रदेशचे चौकीदार आहोत. मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार समजतो असे म्हटले आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray)यांनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी असे म्हटले आहे. तसेच माफी मागूनच अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर यावे असे म्हटलं आहे. दरम्यान होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणूका आणि विरोधाकडे पाहता राज ठाकरे यांनी आपला अयोध्येचा दौरा रद्द केला.
Published on: May 26, 2022 07:39 PM