Darishsheel Mane | विरोधकांनी पायऱ्यांवर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत – tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 5:10 PM

माने म्हणाले, या सरकारचं हे पहिलच अधिवेशन आहे. तर या फार अपेक्षांना या सरकारकडे सुद्धा लोक पाहत आहेत. तर विरोधकांकडेही लोकांचे लक्ष आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात 50 खोखे, एकदम ओके, अशा घोषणा देत आहेत. त्यावर खासदार धैर्यशील माने यांनी टीका केली आहे. यावेळी बोलताना माने म्हणाले, या सरकारचं हे पहिलच अधिवेशन आहे. तर या फार अपेक्षांना या सरकारकडे सुद्धा लोक पाहत आहेत. तर विरोधकांकडेही लोकांचे लक्ष आहे. मात्र दुर्दैवाने राजकीय व्यासपीठ म्हणून याचा वापर न होता, लोकांचे प्रश्न न मांडता असं पायऱ्यांवर घोषणा दिल्या जात आहेत. हे निश्चितपणे निंदनीय आणि महाराष्ट्राला अशोभनीय आहे. जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे. पायऱ्यांवर जो काही गोंधळ सुरु आहे तो फक्त आणि फक्त सवंग लोकप्रियतेसाठी सुरू असल्याचा आरोप ही माने यांनी केला आहे.

 

Uday Samant | अनेक जण तर घोषणा सुद्धा देत नाहीत, कारण त्यापैकी अनेक जण नाराज- tv9
Special Report | आता संघर्ष रस्त्यावर होणार? शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार?