शिवसेना खासदार कीर्तीकर यांची ‘त्या’ दाव्यावर सारवासारव; यू-टर्न घेत म्हणाले, ”सापत्न वागणूक…”
एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. आता मात्र ते सारवासारव करताना दिसत आहेत. तसेच या विशयावर पडदा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी त्यांच्या सापत्न वागणूक या आधीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. आता मात्र ते सारवासारव करताना दिसत आहेत. तसेच या विशयावर पडदा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यावरून आता किर्तीकर यांनी, भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात बीजेपी-शिवसेना युतीचं नव्हती. महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तिच युती होती. शिंदे साहेबांनी उठाव भाजप शिवसेनेची युती आनली. पुन्हा शिवसेना-बीजेपीच सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले. आम्ही पुन्हा एनडीएचे घटकपक्ष झालो. खासदार वावरत होतो. आम्हला एनडीए घटक पक्षाचा दर्जा नोव्हता. आता आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत.