भाजपला रोखण्यासाठी इम्तियाज जलील यांचा कोणता प्रस्ताव? काय म्हणाले?

| Updated on: Jun 25, 2023 | 12:04 PM

बिहारमधील पटनामध्ये विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. ज्यात 15 पेक्षा अधिक देशातील विरोधी पक्षांनी सहभाग घेतला. तर यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना देखील होती. याबैठकीला राहुल गांधी, नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी, केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते

बुलढाणा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. याचे कारण जसे लोकसभा निवडणूक आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला रोखण्याचे आहे. त्यातूनच काल बिहारमधील पटनामध्ये विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. ज्यात 15 पेक्षा अधिक देशातील विरोधी पक्षांनी सहभाग घेतला. तर यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना देखील होती. याबैठकीला राहुल गांधी, नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी, केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यांच्यासह जवळपास सर्वच विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावरूनच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधकांच्या या एकजूटीवरून सल्ला देताना टीका देखील केली आहे. त्यांनी देशात भाजपला हरवायचं असेल तर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय ते शक्य होणार नसल्याचं म्हटलं आहे. तर सगळ्यात आधी एमआयएमने भाजपला हरविण्याचा विडा उचलला. कारण भाजपने या देशाला तोडण्याचे केलं आहे.

Published on: Jun 25, 2023 12:04 PM
“अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष होतील असं वाटलं होतं”, भाजप नेत्याचा राष्ट्रवादीला चिमटा
अंबादास दानवे यांची डॉक्टरेट पदवी बोगस? पाहा काय म्हणाले संजय शिरसाट…