यंदाच्या अर्थसंकल्पात हे असावं; नवनीत राणांनी अपेक्षा सांगितल्या…
खासदार नवनीत राणा यांनी उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या काय म्हणाल्या आहेत, पाहा...
नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा यांनी उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच बजेट शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी संधी देणार असेल, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कालची बैठक घेतली, ती पॉझिटिव्ह होती. ज्या खासदारांनी बहिष्कार टाकला तो मतदारांवर बहिष्कार टाकण्यासारखा आहे. कालच्या बैठकीमुळे महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लागणार आहेत, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय.
Published on: Jan 31, 2023 10:56 AM