Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जेजे रुग्णालयात हलवलं, प्रकृती आणखी खालावली?

| Updated on: May 04, 2022 | 11:11 AM

खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं.

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भायखळा जेलमधून जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी राणा दाम्पत्याचा अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण राणा यांच्या खारमधील घराची मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) तपासणी करणार आहे. तशी नोटीसच मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम, काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेनं तपासासाठी नोटीस पाठवली आहे.

Published on: May 04, 2022 11:07 AM
Pune : नानापेठेतील मशिदीबाहेर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 4 May 2022