वय कितीही असलं तरी दिसलं नाही पाहिजे, प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य
दिवंगत माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र दिलीप माने हे 2009 साली दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2014 साली ते काँग्रेसच्या चिन्हावर दक्षिण सोलापूर विधानसभा जागेवर उभे राहिले असता भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.साल 2019 ते शिवसेनेत गेले होते. ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले आहेत.
सोलापूर दक्षिण मतदार संघातून माजी आमदार दिलीप माने यांना कॉंग्रेसने आमदारकीचे तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. दिलीप माने कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र आहेत. त्याच्या निवडीबद्दल एका कार्यक्रमात त्यांच्या काम करण्याच्या धडाक्याबद्दल कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कौतूक केले आहे. त्या म्हणाल्या की माने साहेबांना मी आमदार असताना मला खूप सहकार्य केले होते, त्यांना केव्हाही सकाळी लवकर फोन केला तरी ते बॅंकेत हजर असत.त्यांच्याकडे पाहून त्यांचे वय 61 आहे हे अजिबात वाटत नाही. लवकर उठणे, शाकाहारी जेवण करणे आण रात्री वेळेवर झोपणे यामुळे हे शक्य झालेले असावे असेही प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. दिलीप माने मध्यंतरी वाट चुकले परंतू पुन्हा ते स्वगृही आल्याचा आनंद आहे. त्यांच्या येण्याने सोलापूर दक्षिण आमदारकीची निवडणूक जिंकणे ही केवळ औपचारीकता राहील्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.