VIDEO : पीपीई किट घालून खासदार प्रितम मुंडे थेट कोव्हिड वॉर्डात
VIDEO : पीपीई किट घालून खासदार प्रितम मुंडे थेट कोव्हिड वॉर्डात

VIDEO : पीपीई किट घालून खासदार प्रितम मुंडे थेट कोव्हिड वॉर्डात

| Updated on: Apr 15, 2021 | 12:52 PM

खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी पीपीई किट घालून बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. (MP Pritam Munde Visit Beed District Hospital wearing PPE kit)

बीड : बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी पीपीई किट घालून बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. (MP Pritam Munde Visit Beed District Hospital wearing PPE kit)

बीडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये. तसेच त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रितम मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट परिधान केला होता. यानंतर त्यांनी या रुग्णालयातील आरोग्य सुविधांची माहिती घेतली. तसेच कोव्हिड रुग्णांची संवादही साधला.

Maharashtra Lockdown | लॉकडाऊनला शिर्डीकरांचा चांगला प्रतिसाद, साई मंदिर परिसरात शुकशुकाट
Chandrakant Patil LIVE | संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतील : चंद्रकांत पाटील