‘आनंदानं टाळ्या वाजवल्याशिवाय दुसरं काहीही करू शकणार नाहीत’; शिंदे गटावर राऊत यांची खरमरीत टीका
त्यांनी अजित पवार यांच्याकडून मतदार संघातील कामांसाठी निधी मिळत नसल्याची टीका केली होती. तर अर्थमंत्रालय त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून शिनसेनेवर अन्याय होत असल्याची टीका केली जात होती. तेच अजित पवार हे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहे.
नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना फूटली तेंव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर पडलेल्या आमदारांनी त्याचे खापर अजित पवार यांच्यावर फोटलं होतं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याकडून मतदार संघातील कामांसाठी निधी मिळत नसल्याची टीका केली होती. तर अर्थमंत्रालय त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून शिनसेनेवर अन्याय होत असल्याची टीका केली जात होती. तेच अजित पवार हे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहे. ते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यांच्याकडे आता अर्थमंत्रालय देखील आलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका करताना, अर्थखात्यावरून शिंदे गटाला टोला लगावला आहे. “अजित पवारांकडे अर्थखातं गेल्यामुळे फरक पडणार नाही असं बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही. त्यांना अजित पवारांची धुणीभांडी करावीच लागतील अस देखील राऊतांनी म्हटलं आहे. तर अजित पवारांचा निधी हा दुसरा मुद्दा आहे. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच आमच्याबरोबर नको हे त्यांचं म्हणणं होतं. आज तेच सत्तेत सहभागी झाल्यावर हे सगळे लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहेत. ही त्यांची मजबुरी असून त्याशिवाय दुसरं काहीही शिंदे गट करू शकणार नाहीत”, असही राऊत यावेळी म्हणालेत.