खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात ही केवळ अफवा
शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknathh Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील शिवसेना (Shivsena) कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी ही घोषणा केली आहे. 31 ऑगस्टपर्यंत पक्षाची पुर्नबांधणी करत पक्षाला नवीन बळकटी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknathh Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे शुद्धीकरण करण्यासाठी या पदांमध्ये बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तसेच या बदलाचे सुरुवात या मेळाव्यापासून झाली असल्याचे मंडलिक यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 10, 2022 04:35 PM