‘त्यांनी संसदेच्या बाहेर जे वक्तव्य केलं ते संसदे करावं’; मणिपूरवरून राऊत यांचा मोदी यांना टोला

| Updated on: Jul 24, 2023 | 12:18 PM

तेथे त्यात अजूनही सुधारणा नाही. किंवा तो हिंसाचार थांबलेला नाही. मणिपूर जळत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई, 24 जुलै 2023 | मणिपूरमध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. तेथे त्यात अजूनही सुधारणा नाही. किंवा तो हिंसाचार थांबलेला नाही. मणिपूर जळत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून देशभरातील खासदार दिल्लीत येणार आहेत. तर ते मणिपूरवर चर्चा करतील. यावेळी पंतप्रधान मोदी यावेळी संसदेत असायला हवं. मात्र ते नाहीत. त्यांनी या चर्चेवेळी उपस्थित रहायला हवं. तर पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या बाहेर मणिपूरवरून जे वक्तव्य केलं ते त्यांनी संसदेमध्ये करावं असा टोला लगावला आहे. तर या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असून विरोधीपक्षांचा आवाज देखील दाबला जातोय असे देखील राऊत यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 24, 2023 12:18 PM
‘मंत्रीपद दिली नाही म्हणून तुम्ही त्याची किंमत देताय का?’ राऊत यांचा असा सवाल
भरत गोगावले यांना भरभरून निधी; अजित पवार यांच्याकडून खूश करण्याचा प्रयत्न?