काय होईल जेंव्हा भाजपचे 144 आमदार झाले तर; शिंदे गट काय धुणीभांडी करणार? संजय राऊतांचा थेट सवाल

| Updated on: Jan 02, 2023 | 6:35 PM

जर भाजप 144 आमदार निवडणून आणण्याची रणनीती आखत असेल तर शिंदे गट काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला आहे

आज चंद्रपूर येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आपलं लक्ष हे लोकसभा असेल असे स्पष्ट केलं. तसेच भाजपचे 144 आमदार ही निवडुण आणण्याचा मानस सांगितला. यावरून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.

यावेळी राऊत यांनी, शिंदे गटाशी युती ही भाजपने केलेली तात्पुरती तडजोड असल्याचे सांगत, हे सरकार फार काळ काही टिकणार नाही. तर शिंदे गटातील अनेक आमदार हे भविष्यात भाजपमध्येच जातील. तर आम्ही परत त्यांना घेणार नाही असे राऊत यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर जर भाजप 144 आमदार निवडणून आणण्याची रणनीती आखत आहे. मग अशावेळी शिंदे गटातील लोक हे केवळ धुणीभांडी करायला ठेवले आहेत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच शिंदे गटाचे ते 16 आमदारही अपात्र ठरतील असेही राऊत म्हणाले.

Published on: Jan 02, 2023 06:35 PM
तो तसा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं: जितेंद्र आव्हाड
Indrajit Sawant | ‘संभाजी महाराजांना एका धर्माचे रक्षक म्हणून पुढे आणणं चुकीचं’: इंद्रजित सावंत