‘तुम्हाला ‘त्या’ विषयावर पीएचडी करायची आहे का?’ संजय राऊत याचा भाजपला सवाल

| Updated on: Aug 06, 2023 | 12:51 PM

सूरत न्यायालयाने सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आता याला स्थगिती ७२ तास ओलंडून गेले आहेत. मात्र राहुल गांधी यांना खासदारकी मिळालेली नाही. मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

मुंबई, 06 ऑगस्ट 2013 | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. सूरत न्यायालयाने सुनावलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आता याला स्थगिती ७२ तास ओलंडून गेले आहेत. मात्र राहुल गांधी यांना खासदारकी मिळालेली नाही. मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर देखील निशाना साधला आहे. यावेळी राऊत यांनी, हे सरकार राहुल गांधींना घाबरले आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच सभापतींनी त्यांचे सदद्यत्व रद्द केलं. त्यांना सरकारी घराच्या बाहेर काढलं. पण आता त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याला आता ७२ तास ही झाले आहेत. मात्र अजूनही राहुल गांधींना खासदारकी परत केलेली नाही. म्हणे त्यांना अभ्यास करायचा आहे? याच्या आधी त्यांनी याचा अभ्यास केला नव्हता का? असा सवाल करताना यावर का तुम्हा पीएचडी करायची आहे का? असा खोचक टोला लगावला आहे.

Published on: Aug 06, 2023 12:51 PM
Mumbai Mega Block | मुंबईकरांनो… आज लोकल ट्रेननं प्रवास करताय? जाणून घ्या कसा आहे मेगाब्लॉक?
अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात अचानक बदल, सर्व बैठका रद्द अन् दिल्लीकडे रवाना होणार