VIDEO | जागा वाटपावरून राऊत यांनी महायुतीला डिवचलं; म्हणाले, ‘एक डाऊटफूल, दोन हाफ यांनी…’
सध्या आगामी निवडणुकांवरून सर्वच पक्षांच्या बैठका आणि मोर्चे बांधणाीला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमिवर महायुतीत बैठकांना जोर आला आहे. तर जागा वाटपांबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा आणि महानगर पालिका निवडणूका लक्षात घेऊन सर्वच पक्ष तायरीला लागले आहेत. तर ठाकरे गटाकडून आता लोकसभेच्या दृष्टीकोणातून मतदारसंघनिहाय आढाला बैठका घेतला जाऊ लागल्या आहेत. याचदरम्यान महायुतीकडून देखील जागा वाटपाच्या फार्म्युलावर चर्चांना जोर आला आहे. तर भाजप, शिंदे गटातील नेत्यांकडून ४८ च्या ४८ जागा महायुतीच्या येतील असा दावा केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटाला टोला लगावला आहे. त्यांनी, मविआत सगळं व्यवस्थित असून ४८ जागांच्या वाटपाबाबत लवकरच निर्णय होईल तर आमच्याच त्यावरून सगळं सुरळीत होईल असे म्हटलं आहे. पण याच जागा वाटपावरून महायुतीतील शिंदे गट-भाजप आणि अजित पवार गट हे एकमेकांच्या छाताडावर बसतील असा टोला लगावला आहे. तर एक डाऊटफूल आणि दोन हाफ यांनी जागावाटपाची चिंता करावी असे देखील त्यांनी म्हटलं आहे.