राऊत यांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल; ED, CBIला ही इशारा

| Updated on: Jun 26, 2023 | 9:24 AM

त्यांनी यावेळी ED, CBIला इशारा देताना 2024 ला तुम्हाला आदेश मानावे लागतील असेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर निशाना साधताना जी राहिलेली शिवसेना आहे तिही बरखास्त करू पण या गद्दारांना दारात सुद्धा उभं करून घेणार नाही.

सातारा : ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह शिंदे गटावर निशाना साधळा आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी ED, CBIला इशारा देताना 2024 ला तुम्हाला आदेश मानावे लागतील असेही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर निशाना साधताना जी राहिलेली शिवसेना आहे तिही बरखास्त करू पण या गद्दारांना दारात सुद्धा उभं करून घेणार नाही. हवं तर घरात बसू असं म्हटलं आहे. तर मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास संपवायचा आहे असा घणाघात केला आहे. तर 40 गद्दारांच्या हातावर शिवसेना ठेवण्याचे पाप शाह यांनी केल्याचंही ते म्हणालेत.

Published on: Jun 26, 2023 09:24 AM
फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल? म्हणाले, ‘…तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं?
“24 वर्षात केलेली घाण साफ करायला वेळ लागणार ना?”, शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल