‘बात निकलेगी तो दूर तक जायेगी’!; श्रीकांत शिंदे यांचा थेट इशारा; SIT, ED लागल्याची केली टीका
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर हातोडा मारण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. तर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे इशारा केला.
तुळजापूर : वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केली. त्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर हातोडा मारण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. तर ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे इशारा केला. तसेच वर्षावरून शिंदेंकडूनच हातोडे मारण्याचे आदेश गेले असा आरोप केला होता. त्यावर शिंदे यांनी आता पलवारक केला आङे. तसेच त्यांनी ठाकरे गटाकडे आता काही राहिलेलं नाही. त्यांच्यामागे आता SIT, ED च्या चौकशा लागल्यानं ते असं बोलत आहेत. मात्र खरं सत्य आता बाहेर येईलच. तर बात निकलेगी तो दूर तक जायेगी असा इशारा दिला आहे.
Published on: Jun 28, 2023 07:46 AM