Video : माझी ऐकायची तयारी, तुम्ही फक्त शांत व्हा- सुप्रिया सुळे
एसटी संपातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी थेट सिल्वर ओक (Silver Oak, Sharad Pawar Residence) गाठून शरद पवारांच्या घरावर धडक दिली. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला. ‘माझी ऐकायची तयारी आहे. तुम्ही फक्त शांतपणे बसा. मी सगळं ऐकून घ्यायला आली आहे’, […]
एसटी संपातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी थेट सिल्वर ओक (Silver Oak, Sharad Pawar Residence) गाठून शरद पवारांच्या घरावर धडक दिली. यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला. ‘माझी ऐकायची तयारी आहे. तुम्ही फक्त शांतपणे बसा. मी सगळं ऐकून घ्यायला आली आहे’, असं हात जोडून सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आंदोलकांना आवाहन केलं. “शांततेच्या मार्गानं मी त्यांना अनेकवेळा नम्रपणे विनंती केलेली आहे. हात जोडलेत. मी त्यांच्याशी आता बोलायला तयार आहे. माझे आईवडील, माझी मुलगी घरामध्ये आहे. मी या सगळ्यांसोबत या क्षणी चर्चा करायला तयार आहे. मी पुढच्या मिनिटाला चर्चेला बसायला तयार आहे. माझी तुम्हाला विनम्रपणे विनंती आहे.. मी माझ्या आईवडील आणि मुलीला भेटून येते आणि मग मी तुमच्याशी बोलते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.