Unmesh Patil | ‘माता बाल संगोपन केंद्राच्या भूमिपूजनावेळी प्रोटोकॉलचा भंग’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कायम टिंगल टवाळी करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मात्र पंतप्रधानांनी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन करताना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे होती, अशा शब्दात खासदार उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
जळगाव : जळगाव येथे शासकीय माता-बाल संगोपन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह स्थानिक खासदार आमदारांची नावे पत्रिकेत डावलण्यात आली. प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रेय लाटण्यासाठी ठेकेदारांना हाताशी घेऊन हा प्रकार केल्याचे सांगत खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सदर शासकीय माता बाल संगोपन केंद्रासाठी आपण पाठपुरावा करून हे शासकीय माता बाल संगोपन केंद्र मंजूर करून आणले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कायम टिंगल टवाळी करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मात्र पंतप्रधानांनी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन करताना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे होती, अशा शब्दात खासदार उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.