गरज सरो वैद्य मरो असा भाजपचा डाव, राणेंचा ही डाव भाजप करणार : राऊत
राणेंना लक्ष करताना, राऊत यांनी, तुमच्या खात्यातील लोकांनी कोणाचे किती पैसे उकळले हे वेळ आल्यावर समोर आणू. तर भाजपकडून राणे सारख्या लोकांना संपविण्याचा प्लॅन असल्याचा घणाघात ही त्यांनी केला.
सिंधुदूर्ग : कोकणातील राजकारण ही राज्यातील राजकारणाप्रमाणेच तापलेलं असतं. येते उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात सतत टीका टिपण्णी होताना दिसते. आताही विनाय राऊत यांनी नारायण राणेंना लक्ष केलं. तसेच वेळ आली की सगळं समोर आणू असा इशाराच त्यांनी दिला आहे.
त्याचबरोबर राणेंना लक्ष करताना, राऊत यांनी, तुमच्या खात्यातील लोकांनी कोणाचे किती पैसे उकळले हे वेळ आल्यावर समोर आणू. तर भाजपकडून राणे सारख्या लोकांना संपविण्याचा प्लॅन असल्याचा घणाघात ही त्यांनी केला.
तसेच भाजपकडून राणे सारख्या लोकांना संपविण्याचा प्लॅन असून वेळ आली की ते राणेंचाही डाव करतील अशी टीका भाजपवर राऊत यांनी केली. तर गरज सरो वैद्य मरो असा भाजपचं काम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jan 05, 2023 03:11 PM