भाजप केव्हाही एकनाथ शिंदेंना नारळ देईल; ठाकरेगटाच्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Jan 30, 2023 | 3:17 PM

शिवसेना ठाकरेगटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पाहा काय म्हणालेत...

शिवसेना ठाकरेगटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना भाजप लवकरच नारळ देणार आहे, असं विनायक राऊत म्हणालेत. शिंदेंचं सरकार आउट घटकेचे सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर शिंदेंचं विसर्जन 1001 टक्के आहे. यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, असंही राऊत म्हणालेत. आज मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांची बैठक बोलावली आहे. पण आम्ही ठाकरे गटाचे खासदार या बैठकीला जाणार नाही. या बैठकीची चेष्ठा सुरू आहे. या परंपरेला मुख्यमंत्र्यांनी काळं फासलं आहे, असंही विनायक राऊत म्हणालेत.

Published on: Jan 30, 2023 03:16 PM
एकनाथ शिंदे यांचे एमआयएमसोबत पूर्वीपासून संबंध- चंद्रकांत खैरे
कसबा, चिंचवडबाबत मनसेची भूमिका काय? यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी