रोहित पवार यांना नोटीस, कोर्टाने दिला दिलासा, नोटीसच रद्द केली

| Updated on: Oct 19, 2023 | 10:09 PM

रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोच्या 2 युनिट्सवर एमपीसीबीने नोटीस बजावली होती. या नोटीसला रोहित पवार यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.

मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कंपनीविरोधात एमपीसीबीनी दिलेली नोटीस कोर्टाने रद्द केली आहे. मात्र, एमपीसीबीला नव्याने निरीक्षण करून गरज भासली तर नव्याने नोटीस जारी करा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच, रोहित पवार यांना 15 दिवसांची मुदत द्यावी. सदर नोटिसवर त्यांचे उत्तर मागवा, मग योग्य तो निर्णय घ्या असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला दिले. हायकोर्टाने रोहित पवार यांची ही याचिका निकाली काढली त्यामुळे रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे.

Published on: Oct 19, 2023 10:08 PM
ठाकरे गटाचा नाशिकमध्ये इशारा मोर्चा, संजय राऊत म्हणाले तुमची लक्तरे…
आधी मराठा आरक्षण मग इलेक्शन, ‘मी सुनील बाबुराव कावळे मुक्काम पोस्ट चिकणगाव…’