ना मेल किंवा मेसेज, माहिती न देताच घेतली परिक्षा?; कुठं झाला हा सावळा गोंधळ?
नाशिकमध्ये बीएडच्या सीएटी परीक्षेत गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नाशिक : काही दिवसांपुर्वीच एमपीएससी परिक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यातच आता भावी मास्तरांच्या भवितव्याचा प्रश्न उद्भवला आहे. नाशिकमध्ये बीएडच्या सीएटी परीक्षेत गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे घेण्यात येणाऱ्या बीएडच्या सीएटी परीक्षेच्या हॉल तिकीटावर आजची तारीख असताना ती कालच घेण्यात आल्याचे उघड होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला आहे. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
Published on: Apr 26, 2023 01:11 PM