MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली, आयोगाने घेतला निर्णय
mpsc exam postpond

MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली, आयोगाने घेतला निर्णय

| Updated on: Aug 22, 2024 | 1:25 PM

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी 25 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची अडचण झाली होती. यासंदर्भात सरकार ऐकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले होते आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं होते.

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालेले आहे. MPSC ची 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. एमपीएससीच्या पुढे ढकलेल्या परीक्षेची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. ती आता नंतर जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात परवापासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. या आंदोलन स्थळी काल खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. एमपीएससी परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा या एकाच 25 ऑगस्ट रोजी असल्याने दोन्ही पैकी एकाच परीक्षेला बसण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार होती.त्यामुळे एक परीक्षा गमाविण्याची भीती विद्यार्थ्यांना होती. या संदर्भात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहीत पवार यांनी आंदोलन स्थळी तळ ठोकला होता. येथील विद्यार्थ्यांची संख्या 30 हजार झाल्याचे रोहीत पवार यांनी म्हटले होते. आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज आंदोलन स्थळाला भेट देणार असे ट्वीट केले होते. मात्र याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज सकाळी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Published on: Aug 22, 2024 01:24 PM
पुण्यात पाच महिन्यांत 163 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, ओळखीच्या व्यक्तींकडूनच गुन्ह्यांचे प्रमाण अधिक
बदलापूरातील आंदोलन राजकीय होते, पण गुन्हा दाखल झाला ना, उद्धव ठाकरे कडाडले