पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा आंदोलन; काय कारण पाहा…

| Updated on: Feb 03, 2023 | 11:36 AM

पुण्यात आज पुन्हा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत.

पुणे : पुण्यात आज पुन्हा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतंय. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. याआधी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत नवीन परीक्षा प्रणाली 2025 पासून लागू करा, अशी मागणी केली होती. त्याच अनुषंगाने अगदी काही दिवसापूर्वी राज्य सरकारकडून हा निर्णय देखील घेण्यात आला होता. पण आता राज्य सरकारच्या याच निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध दाखवत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा 2023 पासूनच घ्या, अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत.

Published on: Feb 03, 2023 11:35 AM
बच्चू कडू यांची शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या निकालावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
विजयाचा आनंद आहे पण, काँग्रेसच्या माध्यमातून झाला असता तर… ; काय म्हणाले सत्यजित तांबे