MPSC विद्यार्थ्यांचे उपोषण, मुख्यमंत्री शिंदे यांचे ‘ते’ विधान आणि अजित पवार संतापले
MPSC चे विद्यार्थी उपोषणाला बसलेत आणि मुख्यमंत्री म्हणतात हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवणार. निवडणूक आयोगाकडे काय पाठवतो ?
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सरकार सहमत आहे. त्यांच्या मागण्यांबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. MPSC चे विद्यार्थी उपोषणाला बसलेत आणि मुख्यमंत्री म्हणतात हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवणार. निवडणूक आयोगाकडे काय पाठवतो ? राज्याचे मुख्यमंत्री आहे ना तुम्ही ? हे मुद्दाम बोलतोय का ? एकदा नाही झाले हे. मान्य माणसाकडून बोलताना चूक होते. पण, आम्ही लगेच ती चूक सुधारतो. एकदा नाय दोनच नाय चारदा म्हणाले निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने यांचे काम केले आता त्यांची तिकडेच मिळती जुळती सुरूय, असा टोला अजित पवार यांनी लगावला.