‘सरकारनं विचार करावा’, आता एमपीएससी विद्यार्थ्यांची आयोगाकडे कोणती मागणी?

| Updated on: Jun 07, 2023 | 1:29 PM

मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कौशल्य चाचणी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. मात्र आता यावरूनच एमपीएससी परिक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत दिसत आहेत. तर याच मुद्द्यावरून आता एमपीएससी देणारे विद्यार्थी सरकार आणि आयोगाला निवेदन देण्याच्या तयारीत आहेत.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लिपिक, टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची परिक्षा पार पडली. मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कौशल्य चाचणी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. मात्र आता यावरूनच एमपीएससी परिक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत दिसत आहेत. तर याच मुद्द्यावरून आता एमपीएससी देणारे विद्यार्थी सरकार आणि आयोगाला निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. तसेच आयोगाने घातलेल्या अटीत बदल करण्यात यावा अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच कौशल्य चाचणी उत्तीर्णची अटीमध्येच घोळ असून सतत तांत्रिक अडचणींनाही एमपीएससी देणारे विद्यार्थ्यांना तोंड द्याव लागत आहे.

Published on: Jun 07, 2023 01:29 PM
दंगली कुणाला हव्या? याचा मास्टरमाइंड कोण? नितेश राणे यांच्या निशाण्यावर कोण?
“भाजप सत्तेत आल्यापासून वातावरण दुषित कसं होतयं?”, कोल्हापुरातील घटनेनंतर सुप्रिया सुळे यांची टीका