केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत झोपीचं सोंग घेतंय; कुणाचं टीकास्त्र
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेत्या रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. तसंच त्यांनी आंदोलनही पुकारलं आहे. पाहा..
मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे नेत्या रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. “केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत झोपीचं सोंग घेत आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. तो हतबल झाला आहे. या दोन्ही सरकारला जागी करण्यासाठी 3 मार्चला आम्ही जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत. शेतकऱ्यांनी आणि सामान्य जनतेनं या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी रोहिणी खडसे यांनी केलं आहे.
Published on: Feb 28, 2023 02:47 PM