मुंबई-अहमदाबाद प्रवास आता सुसाट होणार, कसा? पाहा व्हीडिओ…

| Updated on: Mar 28, 2023 | 7:55 AM

Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी. घोडबंदरचा वर्सोवा नवा ब्रिज प्रवाशांसाठी खुला झालाय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. घोडबंदरचा वर्सोवा नवा ब्रिज कालपासून वाहनासाठी खुला झाला आहे. जानेवारी 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाचं भूमिपूजन केलं होतं. काल दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टिवट करत हा पूल सुरू झाल्याचं सांगितलं. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबईकडून गुजरातला जाणारे आणि गुजरातवरून मुंबईला येणाऱ्या वाहनधारकांसाठी घोडबंदर वर्सोवा ब्रिजवर तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. पण आता नवा सर्वात मोठा घोडबंदर खाडीवरील वर्सोवा ब्रिज सुरू झाल्याने वाहनधाराकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published on: Mar 28, 2023 07:50 AM
शिवसेना-मनसेचं काहीतरी जुळतंय? राज ठाकरे आणि मुख्मंत्र्यांच्या भेटीसंदर्भातील बघा स्पेशल रिपोर्ट
क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता झाले, पोलिसात तक्रार केली; मग ‘असा’ लागला शोध