मुंबईकरांचा त्रास वाढता वाढता वाढे… हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाचे आजारही वाढले
मुंबईमध्ये वाढलेले वायू प्रदूषण चिंताजनक आहे. उच्च AQI, पीएम 2.5 आणि पीएम 10 चे प्रमाण, आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ ही परिस्थिती दर्शवते. विकासकामे आणि बांधकामामुळे धूळ वाढली आहे. महापालिका आणि राज्य सरकार यावर कारवाई करत असले तरी, अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमाावर आणि आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. मुंबईकरांना श्वसनाच्या आजाराचा त्रास होऊ लागला आहे. हवेत धुलीकण मिसळल्याने हवेचा दर्जा आणखीनच खावला आहे. आज मुंबईत एक्युआय 156 इतका आहे , हवेतील पीएम 2.5 चं प्रमाणही कमी होताना दिसत नाहीये तर पीएम 10 चे प्रमाणही जैसे थे स्थितीत आहे . यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे
सध्या मुंबई मधे मोठी विकासकामे आणि इमारतीच्या बांधकामात मोठी वाढ झाल्यामुळे धूलिकण हे हवेत मोठ्या प्रमाणात मिसळले आहेत त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती मनपाकडून मिळाली आहे. मुंबईच्या या वायुप्रदूषणावर मुंबई महापालिका आणि राज्याच पर्यावरण विभाग अलर्ट मोडवर आहे. मुंबईच्या वायू प्रदूषणावर सरकार कडून ही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले, तर दुसरीकडे मनपाकडून 132 वॉटर कॅनन फवारणी विविध भागात केली जात आहे, पण त्याचाही फारसा फरक पडलेला दिसत नाहीये.त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसत आहे.