राहुल गांधी यांना घरचा आहेर मिळालाय, आता माफी मागा; भाजप आमदार आक्रमक

| Updated on: Mar 25, 2023 | 2:51 PM

चोरमंडळ म्हणणं हे विधानभवनाच्या सदस्यांचा आणि विधिमंडळाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही याचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत भाजप नेत्याने संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच राऊल गांधी यांच्यावरही निशाणा साधलाय. राहुल गांधी यांच्याबाबत आशिष देशमुख यांनी जे विधान केलं आहे, त्यामुळे काँग्रेसला घरचा आहेर मिळालाय, असं भातखळकर म्हणाले आहेत. संजय राऊत यांना आता काहीही कामधंदा उरलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही विधानं केली जात आहेत. भविष्यातही ती येत राहील राऊत यांना मूर्खाच्या नंदनवनमध्ये राहण्याची सवय आहे, असंही भातखळकर म्हणाले आहेत.

…तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; बावनकुळे यांचा राहुल गांधी यांना इशारा
‘गद्दारांना गाडायचं आणि पुन्हा ठाकरेंचा भगवा फडकवायचा’, राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन