Video : प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, मुंबै बँक प्रकरणी पुन्हा चौकशी

| Updated on: Apr 09, 2022 | 3:58 PM

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)  यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मुंबै बँक मजूर (Mumbai Bank Case) प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली (Mumbai Police Notice) आहे. त्यांना  11 एप्रिलला चौकशीला बोलावणही आलं आहे. काही दिवसांपूर्वीही प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरेकरांना पोलीस नोटीस बजावण्याची आता ही दुसरी […]

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)  यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मुंबै बँक मजूर (Mumbai Bank Case) प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली (Mumbai Police Notice) आहे. त्यांना  11 एप्रिलला चौकशीला बोलावणही आलं आहे. काही दिवसांपूर्वीही प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. दरेकरांना पोलीस नोटीस बजावण्याची आता ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळी मी चौकशीला जाणार, कर नाही त्याला डर कशाला? मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार, या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नाही, असे दरेकरांनी ठामपणे सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही कालच पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे भाजपचे दोन नेते आता पोलीस चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

Video : कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?-प्रवीण दरेकर
Video : गुणरत्न सदावर्ते यांचा कोर्टातील युक्तीवाद संपला