500 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राहुल कुल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

| Updated on: Mar 13, 2023 | 12:00 PM

MLA Rahul Kool reaction on Money laundering Case : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनंतर राहुल कुल यांनी tv9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

मुंबई : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपांनंतर राहुल कुल यांनी tv9 मराठीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत बोलले म्हणजे ते आरोप होत नाहीत, असं राहुल कुल म्हणालेत. संजय राऊत काही बोलू शकतात. हे सगळे राजकीय हितासाठी होतंय. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असंही राहुल कुल म्हणालेत. मी विधानसभेच्या हक्कभंग समितीवर आहे. राऊतांवरील कारवाईबाबत आमची चर्चा सुरू आहे. त्याबद्दल आता बोलणं योग्य नाही, असं राहुल कुल म्हणाले आहेत.

Published on: Mar 13, 2023 11:21 AM
Pune TOP 9 News | दहा दिवसातच आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 56 हजार अर्ज
‘त्या’ व्हायरल व्हीडिओवर खासदार संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले…