अंगणवाडी सेविकांचे शिष्ठमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट; मागण्या पूर्ण होणार?

| Updated on: Feb 28, 2023 | 3:40 PM

अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, मागण्याचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे; मागण्या पूर्ण होणार? पाहा संपूर्ण व्हीडिओ...

मुंबई : अंगणवाडी सेविकांचे शिष्ठमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली. अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यासाठी केलेल्या निदर्शनांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करून देत इतर राज्यातील अंगणवाडी सेविकाप्रमाणे मानधन द्यावे. अंगणवाडी कर्मचार्यांना शासकिय दर्जा मिळावा. सेवा निवृत्तीनंतर अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन मिळावी. अंगणवाडी कर्मचारी सेविकांना नवीन मोबाइल व मराठी अॅप मिळावेत. बालकांना 8 रुपयाचा प्रतिदिन पुरक पोषण आहार दिला जातो ती रक्कम दुप्पटीने वाढवून द्यावी, या मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीला मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अंगणवाडी सेविकांचे शिष्ठमंडळ उपस्थित आहे.

Published on: Feb 28, 2023 03:40 PM
मनीष सिसोदिया यांना अटक; आम आदमी पार्टीकडून ठिकठिकाणी आंदोलनं
शिवसेनेला संपवण्याच्या डावात आयुक्त इकबाल चहल सहभागी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट