बाळासाहेब भवनात शिवसेनेची महत्त्वाची बैठक; व्हीपसह अन्य मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

| Updated on: Feb 19, 2023 | 11:36 AM

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. यात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पाहा...

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवसेनेचे विधानसभा प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी ही बैठक बोलवली आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता बाळासाहेब भवन इथं ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री त्याचबरोबर आमदार उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात त्याचबरोबर विरोधकांना कसं प्रत्युत्तर द्यायचं आणि अर्धसंकल्पी अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने काम करायचं यावर सल्ला मसलत होणार असल्याची माहिती आहे. व्हीपच्या संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे.

Published on: Feb 19, 2023 11:30 AM
अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर, करवीर नगरीत बॅनरबाजी; कोण-कोण उपस्थित राहणार?
उद्धवसाहेब, तुम्ही म्हणता रडायचं नाही लढायचं, पण कसं?; शिवसैनिक ढसाढसा रडला